पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा*
स्वागतासाठी शाल, पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन

*पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा*
• स्वागतासाठी शाल, पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन
लातूर, दि. २४ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे २५ व २६ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री ना. भोसले यांचे २५ जानेवारी रोजी तुळजापूर येथून दुपारी १.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह येथे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतील. दुपारी ३.३० वाजता पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. सायंकाळी ५ वाजता लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित ‘संविधान गौरव सभा’ कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता औसा शहराकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता औसा येथे विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांच्या जन्मेजय निवासस्थानी आगमन होईल व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित सोहळ्याला पालकमंत्री ना. भोसले उपस्थित राहतील. सकाळी १०.१० वाजता जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आयोजित ‘हिरकणी हाट २०२५’ या ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सकाळी १०.२० वाजता शासकीय वाहनांचे लोकार्पण, तसेच अभया योजना कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. सकाळी ११.४५ वाजता लातूर एमआयडीसी येथील जे.एस.पी.एम. विद्यालय कॅम्पस येथे महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.४५ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी ३ वाजता लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने साताराकडे प्रयाण करतील.
*स्वागतासाठी शाल, पुष्पगुच्छ आणू नका; पालकमंत्र्यांचे आवाहन*
कोणत्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्यानंतर स्वागताला शाल, पुष्पगुच्छ न स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिकाऱ्यांनी भेटीसाठी येताना शाल, पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
*****