प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांची आरोग्य सेवा राम भरोसे….
दहा दिवसात तालुका आरोग्य अधिकारी यांनी दखल न घेतल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव दवाखान्याला कुलूप लावणार ? नागरिकांची मागणी.

प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांची आरोग्य सेवा राम भरोसे. दहा दिवसात तालुका आरोग्य अधिकारी यांनी दखल न घेतल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव दवाखान्याला कुलूप लावणार ? नागरिकांची मागणी. बाभळगाव प्रतिनिधी बाभळगाव ता. पाथरी जि. परभणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव हे पाथरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो या गावांमध्ये आजूबाजूचे छोटे-मोठे गावकरी आरोग्यसेवा घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बाभ ळगाव येथे येतात पण अनेक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव दवाखान्यात कुठल्याही प्रकारचे आरोग्यसेवा,आरोग्य शिबिर कुटुंब नियोजनाची ऑपरेशन होत नाहीत. तसेच आरोग्य शिबिर ही होत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना उपचार घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. खाजगी रुग्णालयात गेल्यामुळे गोरगरीब नागरिकांची आर्थिक लूट होते. गावामध्ये एकच चर्चा आहे की महाराष्ट्र शासन हे आरोग्य विषयी वेगवेगळ्या सुविधा देतात पण बाभळगाव गावामध्ये महाराष्ट्र शासनाची आरोग्य सेवा एकही सुविधा मिळत नाही. ही चर्चा गावकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नाही. यामुळे आरोग्य सेवक तसेच फार्मासिस्ट आरोग्यसेविका एम पी डब्ल्यू हे सर्व कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत.
नागरिकांना कुठल्याही आरोग्य सेवा रात्री व इमर्जन्सी सेवा मिळत नाहीत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आरोग्य कर्मचारी कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी दबक्या आवाजात बोलतात की वैद्यकीय अधिकारीच रात्रीच्या वेळेस मुख्यालयात राहत नाहीत तर आम्ही का राहू. महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा आरोग्य सेवा देण्यासाठी व मुख्यालयाची दुरुस्ती व डागडुगी करण्यासाठी निधी मिळत असतो पण ते निधी वैद्यकीय अधिकारी खर्च करीत नाहीत. नागरिक असे बोलतात की निधी मिळतो पण जातो कुठे वैद्यकीय अधिकारी यांचे दवाखान्याकडे कुठलेही लक्ष नाही व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील दवाखान्याची स्वच्छता ही नाही. वैद्यकीय अधिकारी दवाखान्याकडे व कर्मचाऱ्याकडे लक्ष न देता मनमानी कारभार करतात. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात न राहत असल्यामुळे इमर्जन्सी सेवा नागरिकाला मिळत नसल्यामुळे हे नागरिक पाथरी किंवा परभणी येथे आरोग्य सेवा घेण्यासाठी जातात. गावकऱ्याची मागणी अशी आहे की तालुका अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बाबळगाव दवाखान्याकडे लक्ष घातले नाही तर आम्ही दहा दिवसाच्या नंतर दवाखान्याला कुलूप लावू असे नागरिकाचे आव्हान आहे.