जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ॲट्रोसिटी कायद्याविषयी मार्गदर्शन
तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ॲट्रोसिटी कायद्याविषयी मार्गदर्शन
- तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
लातूर, दि. २२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी आणि समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज पार पडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बार्टीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे, विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. लक्ष्मण शिंदे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, सचिन नांदेडकर, प्रमुख व्याख्याते सुभाष केकान, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तेजस माळवदकर, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, पोलीस उपाधीक्षक एस. एन. राऊत, लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्यासह तहसीलदार व इतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी कार्यशाळेला उपस्थित होते.
बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनाचा हेतू विशद केला. प्रमुख व्याख्याते सुभाष केकान यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यामधील विविध तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ॲड. लक्ष्मण शिंदे यांनी या कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करताना पोलीस विभागाने कोणती काळजी घ्यावी. तसेच इतर न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली.
बार्टीचे सचिन गिरमे व सामाजिक न्याय विभागामार्फत पुरस्कार प्राप्त झालेले पुरस्कारार्थी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, समाज कल्याण कार्यालयातील अधिकार, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्व तालुका समन्वयक व समतादुत यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अरुण धायगुडे यांनी केले. तालुका समन्वयक श्रीराम शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.