महाराष्ट्र ग्रामीण

लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी घेतली ०३ अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, मदत करण्यासाठी पुढे येण्याचंही केलं आवाहन

लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे.

संपादक : हिराप्रकाश कांबळे…

लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी घेतली ०३ अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, मदत करण्यासाठी पुढे येण्याचंही केलं आवाहन

लातूर : माणूसकी हरवून चाललेल्या या काळात एकमेकास मदत करण्यास सहसा कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र सामाजिक जाणिव भावना जागृत असणारी लोकं आजही अनेक आहेत. त्यात लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे हे ही आहेत. त्यांनी 03 अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील पठाणवाडी येथील लक्ष्मण श्रीमंत लादे व मनीषा लक्ष्मण लादे या पती-पत्नींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना एकूण तीन अपत्य. ज्यात ०९ वर्षीय मुकूंद आणि कोमल ही दोन जुळे तर छोटा मोहन हा ०७ वर्षाचा मुलगा. या तीनही मुलांच्या डोक्यावरील आई-वडीलांचे हरवले. त्यात या लेकरांचा सांभाळ करणाऱ्या आजी आणि चुलत्याची ही घरची परिस्थिती हलाखीचीच. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेची माहिती लातूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांना एका जवळच्या नातेवाईकडून समजली. त्यांनी त्या कुटूंबाची भेट घेवून, विचारपूस करून शहानिशा केली. त्यानंतर राजुळे यांनी कसलाही विचार न करता या अनाथ लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेवू असे आश्‍वासन दिले तसेच या अनाथ मुलांना यापुढील काळात आपण सहकार्य करू अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आज सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांची ओळख एक धडपड्या व्यक्तिमत्व अशी आहे. ते नेहमीच संकटकाळात असणार्‍यांच्या मदतीला धावून जातात. यामुळे त्यांच्या वतीने ते आपल्या मित्र परिवारांना आवाहन करत आहेत की आपल्या परीने जी काही मदत मिळेल ती मदत आपण या कुटूंबाला करून एक सामाजिक बांधलिकी जपावी असे आवाहन संजय राजुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button