जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मदतदार दिवसानिमित्त घेतली शपथ
संपादक :हिराप्रकाश कांबळे

*जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मदतदार दिवसानिमित्त घेतली शपथ*
लातूर, दि. २४ : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदार जागृती आणि लोकशाहीवर निष्ठेबाबत शपथ दिली. तसेच लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील कामगिरीबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांचा सन्मान केला.
उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकट रावलोड, तहसीलदार सौदागर तांदळे, निवडणूक नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
२५ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने २४ जानेवारी रोजी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नवीन, पात्र तरुणांना मतदार म्हणून नावनोंदणीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.