महाराष्ट्र ग्रामीण

घर घर संविधान, सात कलमी कृती आराखडा अंतर्गत उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील संविधान उद्देशिका प्रतिकृती,

जनसंवाद कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

घर घर संविधान, सात कलमी कृती आराखडा अंतर्गत उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयातील संविधान उद्देशिका प्रतिकृती,

जनसंवाद कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर, दि. ३० : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सात कलमी कृती आराखडा अंतर्गत जनसंवाद कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे व जनसंवाद कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले.

 

आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त लातूर जिह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वागतला बुके ऐवजी संविधान देवून प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती लावण्याच्या सूचनाही कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे उद्घाटना पालकमंत्री ना. भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कक्षाची निर्मिती जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून या कक्षाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button